Searching for: ?
Searching for: ?
008000


सप्तशृंगी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तो नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते. आदिशक्तीचे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभार्‍याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते.

अलंकार[संपादन]

देवीची मूर्ती ८ फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. देवीला अकरा वार साडी लागते व चोळीला तीन खण लागतात डोक्‍यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे. कमरपट्टा, पायात तोडे, असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात.

भौगोलिक स्थान[संपादन]

हे स्थान जिल्ह्यात नाशिकपासून उत्तरेस 55 किलोमीटर अंतरावरील दिंडोरी-कळवण तालुक्‍यांच्या सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्री पर्वताच्या पूर्व - पश्‍चिम पर्वतरांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ४५६९ फूट उंचीवर आहे. येथे माकडांची भरपूर वस्ती आहे. देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घालता येते. मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे. नांदूर गावातून गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे. पायी जाण्यासाठी अनेक भाविक येथून सुरूवात करतात.

इतिहास[संपादन]

सप्तशृंग येथे वास्तव्य करणारी करणारी देवी म्हणजेच सप्तशृंगी असे मानले आहे. दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. ऐतिहासिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले, अशी आख्यायिका आहे. तसेच महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला. त्या वेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय. नाथ संप्रदायातील नवनाथांना शाबरी विद्या प्रत्यक्ष देवीने दिली असेही नोंदवलेले आढळते. निवृत्तिनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासना केली होती. शिवाय सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरींमध्ये नोंदवलेला आढळतो. देवी भागवतात देवीची देशात १०८ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे.

कथा[संपादन]

कोणत्याही पुरुषाकडून मरण निळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळाल्यामुळे महिषासुर नावाचा राक्षस माजला होता. त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून करून इंद्राला तिथून हुसकून लावले होते. त्यामुळे तो ब्रह्मा विष्णू व महेश या त्रयींकडे मदतीची याचना करू लागला. त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासुर सप्तशृंगीच्या जवळ होता. देवीने त्याचा तेथेच वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केले अशी कथा आहे

स्वरूप[संपादन]

देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने चढणीचा मार्ग असून, दर्शन घेतल्यानंतर दुसर्‍या बाजूने परतीचा मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग पायऱ्यांचे आहेत.

पूजन[संपादन]

पहाटे पाच वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. सहा वाजता काकड आरती होते. आठ वाजता देवीच्या महापूजेला सुरवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसवून तिचा साज-शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो पेढा आणि वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. बारा वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी ७.३० वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात. देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्यांना आहे. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला विशेष तर तशीही पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते यात भारतभरातून आलेले भाविक असतात. सप्तशृंगीचा नैवेद्य हा पुरणपोळीच असतो. सोबतीला खुरासणीची चटणी, वरण, भात, भाजी पोळीही नैवेद्य म्हणून असते असते. पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकवतात. हा मान त्यांचा असतो. या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते. हा ध्वज ११ मीटर लांबीचा असून केसरी रंगाचा असतो.

गडावरील इतर ठिकाणे[संपादन]

  • कालीकुंड
  • सूर्यकुंड
  • जलगुंफा
  • शिवतीर्थ
  • शितकडा
  • गणपती मंदिर
  • गुरुदेव आश्रम

गडावर जाण्याच्या सोई[संपादन]

गडावर जाण्यासाठी बसगाड्या नाशिक सी.बी.एस. (जुने) व दिंडोरी नाका येथून मिळतात. तसेच उत्सव काळात जास्तीच्या एस. टी. बसेसची सोय करण्यात आलेली असते.

अधिक वाचन[संपादन]

हेसुद्धा पाहा[संपादन]

देवीची साडेतीन शक्तिपीठे

बाह्य दुवे[संपादन]

किल्ल्याबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.
    सं
महाराष्ट्रातील किल्ले (विभागवार)
बागलाण
धुळे
वणी - सातमाळा
मनमाड
अजिंठा
नाशिक - त्र्यंबक रांग
जुन्नर
भिमाशंकर
लोणावळा
पुणे - (मुठा-गुंजवणे-काळ खोरे)
भोर - (भोर-महाबळेश्वर-शिवथर)
महाबळेश्वर - (कोयना-जगबुडी खोरे)
सातारा - (वाई-सातारा-फलटण)
कराड
कोयनानगर
कोल्हापूर - पन्हाळ
कोल्हापूर(दक्षिण)
पालघर
शहापूर
कर्जत - पनवेल
रोहा - (कुंडलिका खोरे)
मंडणगड
उत्तर कोकण
दक्षिण कोकण
उंदेरी किल्लाखांदेरी किल्लाकुलाबा किल्लारेवदंडा किल्लाकोर्लई किल्लाजंजिरापद्मदुर्गबाणकोट किल्लागोवा किल्लाकनकदुर्गफत्तेगडसुवर्णदुर्गगोपाळगडविजयगडजयगडरत्नागिरी किल्लापूर्णगडआंबोळगडयशवंतगड (जैतापूर)विजयदुर्गदेवगडभगवंतगडभरतगडसिंधुदुर्गपद्मदुर्गसर्जेकोटपद्मदुर्गराजकोट किल्लानिवती किल्लायशवंतगड (रेडी)तेरेखोल किल्ला
    सं
महाराष्ट्रातील किल्ले
अलिबाग - हिराकोटअवचितगडकर्नाळाकुर्डूगड - विश्रामगडकोतळीगडकोर्लईखांदेरी किल्लाउंदेरी किल्लाघनगडचांभारगडजंजिरातळगडपेठपेबप्रबळगड - मुरंजनबहिरी - गडदचा बहिरीबिरवाडीभीमाशंकरमाणिकगडमुरुड जंजिरारायगड (किल्ला)लिंगाणासरसगडसुधागडसांकशीचा किल्लाकासा उर्फ पद्मदुर्गघोसाळगड उर्फ वीरगड
0


 

Polish Encyklopedia
English Encyklopedia

Article is licensed under GFDL
It uses material from Wikipedia.org Original article is here
Site should be viewed in Firefox.
Please do not view in Internet Explorer.

RECENT UPDATES: